बलात्काऱ्यांना तत्काळ फाशी द्या, अभाविप भडगाव चे तहसीलदारांना निवेदन देताना
भडगाव (प्रतिनिधी) दिससे न दिवस महराष्ट्रात बलात्कार वाढत असल्याने म्हणूनच होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरतेय, या अनुषंगाने महिलांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारा मुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अभाविप भडगांव शाखेच्या वतीने नराधमांना तत्काळ फाशी देण्यात यावी तसेच महिला सुरक्षा विषयाला गांभीर्याने घेऊन कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी भडगांव तहसीलदार यांच्याकडे निवेदना मार्फत करण्यात आली. यावेळी महिला सुरक्षा या विषयावर अतिशय उदासीनता दाखवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी सारंग पाटील, अशुतोष पाटिल, चेतन हाडपे, कुणाल निकम, मंथन दिक्षीत, राजकुमार शिंदे, तुषार तांबटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा