आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत श्री एम एम कॉलेज पाचोरा ची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील राष्ट्रीय विजेती .

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील राष्ट्रीय विजेती 

पाचोरा (झूम मराठी) क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय 18 वर्षाआतील वयोगटाची राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धा 2022 राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत जळगाव ची भाग्यश्री पाटील प्रथम आली आहे .

तामिळनाडू मधील कोईमतुर पोलाची येथे डॉक्टर महालिंगम इंजिनीरिंग कॉलेज येथे फिडे अंतर्गत ऑल इंडिया फेडरेशन व तामिळनाडू स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18 वयोगटातील मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद निवड बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची एम एम कॉलेज पाचोरा विद्यार्थीनी व परिवर्तन जळगावची भाग्यश्री पाटील हिने अकरा फेऱ्यामध्ये अपराजित रहात 9 विजय दोन बरोबरी करत दहा गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे . या स्पर्धेत तिला कोणीही पराभूत करू शकल नाही या मुळे एकूण 11 फेऱ्या असलेल्या या खेळात 9 व्या फेरीतच तिचे अजिंक्यपद नक्की झाले होते .

पहिल्या तीन विजेते भारत सरकार कडून एशियन टूर्नामेंट व जागतिक अठरा वयोगटाच्या मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील . या अगोदर भाग्यश्रीने सात वयोगटात भारतात पहिला आली होती . तर 10 वयोगटात तीने जगात तिसरा क्रमांक मिळवला होता . सोळा वयोगटात भारतात पहिली आली व जागतिक स्पर्धेत आठवा क्रमांक मिळवला होता . 19 वयोगटातील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत 2022 ला दुसरा क्रमांक मिळवला आहे .  

या मुळे ति एशियन टूर्नामेंट व वर्ल्ड टूर्नामेंट व परदेशातील नामांकन बुद्धिबळ स्पर्धा भारताकडून खेळणार आहे . भारतात फॉरेनच्या ग्रँड मास्टर कडून कोचिंग मिळणार आहे . आत्ता पर्यंत तिने परदेशातील कॉमन वेल्थ व एशियन स्पर्धेत मध्ये भारताला आतापर्यंत 16 आंतरराष्ट्रीय मेडल मिळवून दिले आहेत .

तिच्या या यशाने जळगाव व पाचोरा सारख्या छोट्या गावात राहणारी मुलगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला सिद्ध करू शकते हे भाग्यश्रीने दाखवले आहे . पिटीसी परिवाराला भाग्यश्रीच्या यशाचा खूपच आनंद झाला आहे . महाराष्ट्रभर आपल्या सांस्कृतिक कार्याने परिचित परिवर्तनला भाग्यश्री ने एक नवा आयाम दिला आहे . महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेचे श्री अशोकभाऊ जैन , पाचोरा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासो श्री संजय वाघ तसेच पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष भाई सो श्री दुष्यंत रावल सचिव श्री एन आर ठाकरे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे