ब्रेकिंगमहाराष्ट्र

4 अल्पवयीन मुलं तलावात बुडाली, 13 वर्षाच्या मुलाला दोघांचे प्राण वाचवण्यात यश

झूम मराठी न्यूज

पिंपरी-चिंचवड : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नदी-नाले, तलावं तुडुंब भरली आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार जण बुडाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पिंपरीतील सद्‌गुरूनगर, भोसरी येथे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला. यावेळी एक 13 वर्षांचा मुलगा देवासारखा धावून आला आणि त्याने तीन जणांना बुडताना वाचवले. मात्र यातील एकाची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

तलावात बुडालेली सर्व मुलं गवळी चाळ चक्रपाणी वसाहत भोसरी येथे राहतात. सूरज अजय वर्मा (वय 12, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि ओमकार प्रकाश शेवाळे (वय 13) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. संदीप भावना डवरी (वय 12), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय 14) या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. आयुष गणेश तापकीर (वय 13) याने बुडणाऱ्या तिघांना वाचवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्‌गुरूनगर भोसरी येथील जुन्या कचरा डेपोजवळ असलेल्या तलावामध्ये 12 ते 15 वयोगटातील चार मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही मुले बुडू लागली. दरम्यान ही बाब म्हैस चारण्यासाठी आलेल्या आयुषच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने लगेचच तलावाच्या दिशेने धाव घेतली आणि पाण्यात उडी टाकली. संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले. मात्र सूरज याचा पत्ता लागला नाही.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी दोघांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ओमकार शेवाळे याची प्रकृती गंभीर होती. प्रकृती गंभीर असणाऱ्या ओमकारचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान सुरजचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक विभागाला बोलावण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दोन लहान मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण, आयुषच्या धाडसामुळे दोघांना जीवनदान मिळालं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे