गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक

शरण खन्ना

झूम मराठी कल्याण  : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. अशातच एक विनयभंगाची घटना पुन्हा समोर आली आहे , विशेष म्हणजे यावेळी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली एका भाजप कार्यकर्त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू सहानी असं आरोपीचं नाव असून, आरोपीने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

ही घटना कल्याणच्या टिळक नगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी लहान मुलांची शिकवणी घेते. आरोपीची मुलगी देखील पीडितेकडे शिकवणीला येत होती. पीडिता रविवारी संध्याकाळी आरोपीच्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली असता पप्पू सहानीने तिला रस्त्यातच गाठलं, त्याने अंधाराचा फायदा घेत पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने जीवाचा आटापीटा करत आरोपीच्या आपली सुटका करुन घेतली.

दरम्यान पीडितेने टिळक नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी पप्पू सहानीला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे पप्पू सहानी हा मुलुंडमध्ये भाजपचं काम करतो. तो सध्या कल्याणमध्ये राहतो. दरम्यान या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले आहे.

या घटनेनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आरोपी पप्पू सहानी याचा भाजपशी काहीच संबंध नाही, असं म्हटलं आहे. पण पप्पू सहाणीने आपण मुलुंडमध्ये भाजपसाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे.त्यामुळे भाजप या प्रकरणात हात वर करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकिय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे