धुळे – चोरीच्या ऑटो रिक्षांची कमी दरात विक्रीचे काम काही तरूण गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरात करत होते. याचा छळा लावत पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले असता चोरीच्या रिक्षा विक्रीचे कनेक्शन सांताक्रुज असल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे शहरातील तरुण सांताक्रुज मुंबई येथून ऑटोरिक्षा चोरून धुळ्यामध्ये विकत असल्याची माहिती देवपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवपूर पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर सांताक्रुज येथून हा तरुण रिक्षा चोरून धुळ्यामध्ये कमी दरामध्ये विकत असल्याची कबुली संबंधित तरुणाने पोलिसांना दिली असल्याची माहिती देवपूर पोलिसांनी दिली आहे.
यासंदर्भात सांताक्रुज पोलिसांना देवपूर पोलिसांनी या घटनेबाबत कळविल्यानंतर सांताक्रुज पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत चोरून आणलेल्या ऑटोरिक्षा देखील पुढील तपासासाठी सांताक्रुज पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. परंतु धुळे शहरात विक्री केलेल्या ऑटोरिक्षा शांताक्रुज कनेक्शन समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा