गुलाबी चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बनोटी व आजुबाजूचा परिसरातील खेड्याना बसला
शेतकर्यांचा तोंडात आलेला घास गेला
राज्यात सुरु असलेल्या गुलाबी चक्रीवादळाचा फटका मराठवाडय़ातील बनोटी परीसरात बसला असुन त्याबरोबर खडकदेवळा,निबोरा, गोदेंगाव,पहुरी, धरणाच्या शिवार यांना सुध्दा जबरदस्त फटका बसला आहे! शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास गेल्याने कोटींचे नुकसान झाले आहे
गुलाबी चक्रीवादळाने थैमान घातले!शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे पीक आडवी पबली आहेत! बनोटी गावाच्या परीसरातील शेतकर्यांचे उभे पिक कापणीवर आल्यावर कायमचे हातातुन गेले आहे. यातच पारस जैन नामक शेतकऱ्यांने कालच आपला पपई चा बाग पंधरा लाखात सौदा केला आणि आज नशिबाने दगा दिल्याने गुलाबी चक्रीवादळात संपूर्ण पपई आडवी झाली आहे. या शेतकऱ्यांने हंबरडाच फोडला. बनोटी गावातच पाणी देखील शिरले आहे.अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा