ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी काम करा- छगन भुजबळ
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आपण काम करत असताना शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध-
पुढील निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार निवडून आणा
जळगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी,माजी मंत्री डॉ. सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील,रोहिणी खडसे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ,संतोष चौधरी, किशोर पाटील, कैलास पाटील, अभिषेक पाटील, कल्पना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करा.पक्षाचे नेते पवार साहेब हे आजही अतिशय तत्परतेने काम करतात. त्यांच्याकडे पाहून सर्वांना काम करण्याची प्रेरणा मिळते. ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असून सर्वांना सोबत घेऊन ते काम करताय त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना वाटचाल करावयाची आहे
यावेळी जळगाव जिल्ह्यातील नेते कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्मानाने वागणूक मिळेल त्यांना बोलण्याची आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल असे मी आश्वस्त करतो.
ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठावाडा विद्यापीठाला देण्यास शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. शरद पवार साहेबांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारावर चालत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी सरकार कडून अध्यादेश काढण्यात आला आहे. पाच जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अध्यादेशाप्रमाणे ओबीसी आरक्षण लागू व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे.ओबीसींची जनगणना करण्यात यावी यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत आवाज उठवीत सर्वांना एकत्र केले. त्यासाठी पवार साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जनगणना होऊनही अद्यापही जनगणना जाहीर केली जात नाही आहे. मात्र त्यासाठी आपला लढा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे.पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायचे आहे हा लढा आपण सर्वांनी मिळून लढू.
जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार निवडून येतील यासाठी कामाला लागा. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर आपण काम करत असून शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.कोरोनाच्या काळात सर्वाधिक खर्च शासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेवर करण्यात येत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा