आपल खान्देश

पाचोऱ्यात वाईन शॉप, बियर बार बंदला १०० टक्के प्रतिसाद

झूम मराठी पाचोरा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वरणगाव २० सप्टेंबरला परवानाधारक मद्य विक्रेते ज्ञानदेव हरी झोपे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले होते. त्यांची स्थिती गंभीर आहेत. त्याच्या निषेधार्थ आज पाचोऱ्यात वाईन शॉप, बियर बार आज दुपारी 1 वाजे पर्यंत बंद ठेवाण्यात आले होते.

जिल्ह्यात अवैध ढाबे, किरकोळ हॉटेल व्यवसाय मोठया प्रमाणात वाढत असून कुठलाही परवाना न घेता त्याठिकाणी अवैधरित्या दारु विक्री व दारुप्राशन केले जाते. हे सर्व प्रकार थांबवावे अशी मागणी करीत वरणगाव येथे परवानाधारक विक्रेते ज्ञानदेव हरी झोपे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन जळगाव तर्फे उत्पादन शुल्क अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असो.ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री होते. हा महिन्याकाठी काही कोटी रुपयांचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. असे रॅकेट जिल्हयात कार्यरत आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील ढाब्यावर अवैध दारु विक्री करणाऱ्या मालकावर आणि जागा मालकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

वरणगावला २० सप्टेंबरला परवानाधारक मद्य विक्रेते ज्ञानदेव हरी झोपे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले होते. त्यांची स्थिती गंभीर आहेत.त्याच्या निषेधार्थ आज पाचोऱ्यात वाईन शॉप, बियर बार बंदला १०० टक्के प्रतिसाद नोंदवला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे