महाराष्ट्र

तिकिटाचे पैसे परत द्या, राज्य सरकारला रोहित पवारांचा घरचा आहेर…

काहीही झालं तरी युवकांच्या भविष्याशी कुठल्याही सरकारनं खेळू नये', अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला

आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे काल रात्रीपासून हजारो विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याचा मेसेज मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याने राज्यभरातून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. भाजपने राज्यात अनेक ठिकाणी या विरोधात आंदोलने केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

‘लवकरात लवकर म्हणजेच काही दिवसांत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवाव्यात. त्यासाठी एखादा वरीष्ठ अधिकारी नेमावा. आणि ज्यावेळी परीक्षा घेतली जाईल तेव्हा सर्वसामान्य मुलं एसटीचा प्रवास करतील तो तिकिटाचा खर्चही सरकारच्या माध्यमातून कसा देता येईल याबाबत विचार करावा. काहीही झालं तरी युवकांच्या भविष्याशी कुठल्याही सरकारनं खेळू नये’, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. राजेश टोपे साहेब यात लक्ष घालत असल्याने लवकरात लवकर परीक्षा होतील, असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे