निलेश पाटील
आता शेतकऱ्यांची मुलं म्हणतात आम्हाला नोकरी नाही तर आम्ही कष्ट करून पिकवतो आम्ही ठरवणार आमच्या शेतीमालाची एफ आर पी एकरकमी
75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळून तरी अजूनही शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात असून तीन काळे कायदे केले त्यावर दोन्ही पक्षांच्या सदस्यांच्या सह्या आहेत! दोष कोणाला द्यायचा काहीजण म्हणतात काँग्रेस चांगली काहीजण म्हणता बीजेपी चांगली मग असं का होतय!! जो पक्ष निवडुण येतो तो व्यापारीचेच भले करतो कारण व्यापारी हे त्यांना इलेक्शनच्या वेळी मदत करतात??
तर– शेतकरी हा नैसर्गिक आपत्ती मुळे आणि हमी भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या करतो! असे किती वर्षे चालणार तर शेतकऱ्यांची मुले आता जागृत झाले ते म्हणतात तरुण रक्त आहे हिरवा स्वप्न पाहणार होय आम्ही एक रकमी एफ आर पी येणार आम्ही पिकवतो आम्ही ठरवणार आमच्या शेती मालाची किंमत आज पर्यंत असे चालत आले शेतीमाल शेतकरी पिकवतो आणि मालाचा भाव व्यापारी ठरवतो!! त्यानंतर कच्चा मालावर प्रक्रिया करून त्या पक्या मालाला लेबल लावले जाते!! आणि त्याच भावाने आपल्याला घ्यावे लागते!!असा दुजाभाव आणि फरक का?? म्हणून शेतकरी आत्महत्या थांबता थांबत नाही नैसर्गिक आपत्ती आली तरी चालेल पण हमीभाव पाहिजे भारत आणि अमेरिका हे देश सोडून इतर देशांमध्ये शेतकरी हा जिवंत राहण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध शासन वर्ग करून देतात!! भारतात आणि अमेरिकेत शेती संशोधन आणि शेती उद्योग याकडे पूर्णतः दुर्लक्ष शासक वर्ग करीत आहे! कारण शेतकरी एकदा मागे पडला की तो जमीन विकतो आणि कर्ज देणे-घेणे करतो!!नाही तर आत्महत्या करतो! परत शेतकर्याची तीच परिस्थिती का होते! हे आजपर्यंत शासक वर्गाने का? अभ्यास केला नाही! जो शेतीमाल पिकवतो तो आत्महत्या करतो सगळ्यात जास्त आत्महत्या भारतात स्वतंत्र मिळाल्यावर झाल्या भारत पारतंत्र्यात होता तर— शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या नाही!! याचा विचार सरकारने करावा राजे छत्रपती यांनी शेतकऱ्यांना राजा बनवले शिवशाहीत एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही!! मग काँग्रेस आणि भाजपच्या काळात एवढ्या आत्महत्या का?? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्यामुळे हा परिणाम होत आहे! हे शासक वर्गाच्या कधी लक्षात येणार कारण जो कच्चामाल व्यापारी पक्का करून विकतो त्या मला लेबल लागले जाते!!तर शेतीमालाला लेबल का??नाही!फुकट पाहिजे का?? आजकाल जे शेतकरी नाहीत ते म्हणतात शेतकऱ्यांच्या मुलांना दारू पत्ते जुगार सट्टा असे वळण लागले आहे! मग दारू जुगार पत्ता सट्टा ड्रग्ज अफू गांजा भारतात काय शेतकऱ्यांनी आणले का याचा विचार शासनाने केला पाहिजे तर खाजगीकरण करून सरकारी नोकरी नोकर्या समाप्त कोणी केल्या?? शेती केली तर शेतीमालाला हमीभाव नाही!!करायच काय?? जगायचं कसं हे आता शासक वर्गाने शिकवाव!!म्हणुन श आंदोलनाला शेतकरी बसले आंकवादी नाही!पाहुन या कोण आहेत!!
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा