देश-विदेश

दहशतवादाला खतपाणी घालाणाऱ्यांनी विचार करावा, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

 अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता  पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले आहे.

 भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे. भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीला सामोरे जात आहे. मी अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी अशा भयंकर साथीच्या आजारात आपले प्राण गमावले. अशा कुटुंबियांसोबत माझी संवेदना व्यक्त करतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे