आपल खान्देशकृषीवार्ताब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील गजानन जिनींगच्या सीसीआय केंद्रात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद..

 

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सीसीआय केंद्रात कापूस विक्रीसाठी सुरुवातीला ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर स्लॉट बुकिंग करून कापूस विक्रीसाठी दिला जात आहे, तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

केंद्र शासनाच्या कापूस खरेदी योजनेंतर्गत सीसीआय बाजार समिती माध्यमातून कापसाची विक्रमी खरेदी केली जात आहे पाचोरा गजानन जिनिंग हमीभावाने कापूस विक्रीसाठी सीसीआयचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरत आहे.

कापूस खरेदीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा वेळ वाचेल, तसेच आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असावा आणि बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. तीन दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील. तसेच, सात-बारावर चालू वर्षात कपाशीचा पीकपेरा असणे आवश्यक आहे. कपाशीचे माइश्‍चर ८ ते १२ टक्के असावे, अशी माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी दिली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपला माल सीसीआय केंद्रावर खरेदीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले.


 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे