आपल खान्देश

Chalisgoan | राष्ट्रीय जनमंच पक्षाची चाळीसगाव तालुका आढावा बैठक संपन्न  

चाळीसगाव येथे पक्ष कार्यालयात झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सामान्यांसाठी संघर्ष करणे, महिला, दिव्यांग यांच्या न्यायहक्कासाठी लढणे, कामगारांच्या विषयात लढा देणे, कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवणे त्यांना न्याय देणे या विषयावर चर्चा झाली.

बैठकीत राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार, पक्षाचे धोरण घराघरात पोहोचवण्यासाठी काम करा आणि संघटनात्मक मजबुती वाढवून पक्ष विस्तार करावा अशी सूचना महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी केली. चाळीसगाव तालुक्यातील गावोगावी शाखा उद्घाटन करणे आणि पक्ष विस्तार करावा अशी सूचना जळगाव जिल्हाध्यक्ष वकील आघाडी एडवोकेट महेश मोरे यांनी केली.

यावेळी पक्षाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी आभार मानले. बैठकीला चाळीसगाव शहराध्यक्ष रामराव गोटू नाना देशमुख, चाळीसगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष मयुरी जाधव, चाळीसगाव तालुका अध्यक्ष कामगार आघाडी अमोल पाटील, चाळीसगाव तालुका अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख दाऊद शेख, चाळीसगाव शहर सचिव सचिन शेटे, प्रशांत विठ्ठल कदम, तमीज बेग, गौरव पवार , गणेश मच्छिंद्र कुमावत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे