आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक महाविद्यालयाचे स्काऊट, गाईड शिबीर ..


डगाव कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेमध्ये आज निसर्गरम्य वातावरणामध्ये स्काऊट व गाईड शिबिर उत्साहात संपन्न झालेया.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र न्यावबा पाटील, नारायण किसन पाटील, डॉ. एस वाय पाटील, लीलाधर सुपडू पाटील, दिलीप धोंडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील पहानकर, स्काऊट गाईडचे जिल्हा संचालक व भातखंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे सर भातखंड्याचे स्काऊट मास्तर संदीप पाटील सर, विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे सर, पर्यवेक्षक वाय एम देसले सर, ज्येष्ठ शिक्षक संजू सूर्यवंशी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर स्काऊटच्या पथकाने परेड व स्काऊट संचालन करत वाजत गाजत त्यांचे आगमन स्थळी स्वागत केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाहण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाईडच्या शिक्षिका श्रीमती उज्वला पाटील मॅडम यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संदीप सोमवंशी सर यांनी करून दिला त्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी स्काऊट गाईडचे नियम भूमिका पाटील आणि वचन निशा बोरसे या विद्यार्थिनींनी सांगितले त्यानंतर या महादेव बर्डी मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्काऊट शिबिराविषयी अनमोल असे मार्गदर्शन जिल्हा स्काऊट गाईड समितीचे संचालक संदीप सोनवणे सर यांनी केले त्यात स्काऊट गाईडचे ध्येय, वचन, शिबिराचा उद्देश, निसर्गाची ओळख, शिस्त, एक संघपणा, नेतृत्व गुण अशा विविध अंगी विषयांवर त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर वनभोजनाचा लाभ घेण्यात आला यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण किसन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय नानासाहेब यांच्या शुभहस्ते यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आणि या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर या शिबिराची सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी सोनार व महेश्वरी पाटील यांनी केले तर आभार संदीप सोमवंशी सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक वाय एम देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे