ब्रेकिंग

भडगाव | पत्रकार दिनानिमित्त आरोग्य सेविकांचा केला सन्मान…

 

भडगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी यांच्या साक्षीने तालुक्यातील आरोग्य सेविकांचा गौरव करण्यात आला. जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात साधनाई हट्रीक पुरस्कार प्राप्त करणारे दर्शन विठ्ठल पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

या सन्मान सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, भडगाव तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघ दरवर्षी विविध शासकीय कर्मचारी व सेवाभावी व्यक्तींच्या चांगल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करीत असतो. 

समाजप्रबोधन व सकारात्मक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न भडगाव तालुका पत्रकार संघाकडून सातत्याने केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे