देश-विदेशमहाराष्ट्र

कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज

हरियाणाच्या कर्नालमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग तसेच अनेक रस्ते अडवले आहेत. दरम्यान, हरियाणातील इतर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे केंद्र सरकारने केलेले कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 9 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे.

दरम्यान, हरियाणा भाजप अध्यक्ष ओपी धनखड़ यांच्या ताफ्याला विरोध करण्यासाठी शेतकरी येथे जमले होते, धनखड़ यांचा ताफा बस्तारा टोल प्लाझावर पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच धनखड़ ज्या ठिकाणी सभा घेणार होते. त्या ठिकाणी देखील पोहोचण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला असता या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते शांतपणे बसले होते पण पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यात अनेक शेतकऱ्यांच्या डोक्याला मार लागला आणि शेकडो शेतकरी जखमी झाले.

संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनी यांनी म्हटले आहे की, पोलीसांची ही गुंडगिरी आहे आणि आम्हाला त्याचा ठामपणे विरोध करावा लागेल. आजूबाजूचे सर्व रस्ते आणि टोल जाम करून टाका.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरत, आतापर्यंत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील रस्ते जाम आहेत आणि या सरकारांना या समस्येवर तोडगा काढावा लागेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे