खान्देशात रेल्वे प्रवासाची दयनीय अवस्था. विकास पाटील

खान्देश प्रदेशात ब्रिटिशांनी जेवढे लोहमार्ग बांधले तेवढेच आजही आहेत. त्यामुळे खान्देशी माणसाची रेल्वे प्रवासात खूपच कुचंबणा होते.
धुळे आणि जळगाव मधून मुंबईला जायचं असेल तर रेल्वेने 200 रुपयात माणूस आरामात झोपून प्रवास करून सुखरूप मुंबईला किंवा मुंबई वरून खान्देशात घरी पोहचतो. पण खान्देशातून एक दोन गाड्या सोडल्या तर खान्देशी माणसाला प्रवासासाठी रेल्वे नाहीत.
खान्देशच्या विकासासाठी खान्देशात नवे लोहमार्ग आणि नव्या गाड्या सुरू कराव्यात – बापूसाहेब हटकर
भुसावळ खान्देशच्या विकासासाठी खान्देशात नवे लोहमार्ग आणि नव्या गाड्या सुरू कराव्यात बापूसाहेब हटकर मार्गे खूप गाड्या धावतात. पण त्या दिल्ली कलकत्ता, भुवनेश्वर, पाटणा, गोरखपूर, अमृतसर, गोहाटी इथून येतात. या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. कसं बस गाडीत चढलं तर आतील लोक या खान्देशी प्रवाशाना खूप छळतात. कधी तर धावत्या गाडीतून फेकून देतात. अशा प्रकारे आता पर्यंत एका पत्रकारा सहित ईतर 3 प्रवासी भुसावळ ते पाचोरा या प्रवासात पुष्पर एक्सप्रेस मधून फेकून दिले. गंगा-ताप्ती एकप्रेस मधून अमळनेर जवळ 3 प्रवासी फेकून दिले. हे सातही लोक जागेवर मेले. त्यातील गुन्हेगाराना ना पकडण्यात आले ना मयतांच्या कुटुंबियांना भरपाई दिली.
म्हणून मग हे खान्देशी प्रवासी ट्रॅव्हल बस ने प्रवास करतात. हे बसवाले मनाला येईल तसं भाड आकारतात. हजार दीड हजार रुपया पर्यंत भाड घेतात. ही खान्देशी माणसाची लूट आहे. ईतर भारतीय नागरिकांसारखी खान्देशी नागरिकांना सुध्दा रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणे हा आमचा हक्क आहे.
मराठवाड्यात आता आता रेल्वे सुरू झाली आहे तरी तिथून दिवस भरात 35 पेक्षा जास्त गाड्या सुटतात. मुंबई, अमृतसर, हैदराबाद, सर्विकडे गाड्या सुटतात.
खान्देशाला ब्रिटिश काळात मुंबई भुसावळ दोन पॅसेंजर गाड्या होत्या त्यातील एक रात्री मुंबई हुन सुटणारी पॅसिंजर गाडी शंकरराव चव्हाण नांदेडला घेऊन गेले. तीच आता नंदीग्राम एक्सप्रेस आहे. ब्रिटिश काळात खान्देशला जेवढे रेल्वेमार्ग होते, आजही तेवढेच आहेत. 70 वर्षाच्या स्वातंत्र्य काळात 1 फूट सुद्धा नवा रेल्वे रूळ खान्देश मध्ये टाकला गेला नाही. त्यामुळे दळणवळणात काही विकास झाला नाही. हा आमच्या वर अन्याय आहे. तो दूर कारायचा तर खालील मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
नवे रेल्वेमार्ग
1 मनमाड इंदूर लोहमार्ग
2 चाळीसगाव-अजिंठा-जामनेर- जळगांव पाचोरा चाळीसगाव असा दोन्ही दिशेने रिंगरूट. ही गाडी दिल्ली-आग्रा मार्गावरून धावणाऱ्या पॅलेस ऑन व्हील सारखी लक्झरीयस गाडी असावी. या स्थळाना विदेशी लोक भेट देतात. दुसरी गाडी 40गाव-पाटणादेवी-वेरूळ अशी असावी.
3 तिसरा लोहमार्ग दोंडाईचा-शहादा- म्हसावद-तोरणमाळ असा असावा. ही गाडी दार्जिलिंग किंवा माथेरान सारखी छोटी पर्यटन विशेष गाडी असावी.
4 सुरत-सटाणा-मालेगाव-मनमाड असा एक लोहमार्ग टाका.
5 आता ज्या गाड्या सुरू आहेत त्यांचा मार्ग वाढवा.
अ) धुळे चाळीसगाव शटल रात्रीची शेवटची गाडी नाशिकरोड पर्यंत न्या ती सकाळी नाशिक रोड ते धुळे पर्यंत न्या. ही गाडी 40गाव ते नाशिक रोड पर्यंत फास्ट पॅसेंजर असावी.
ब) मनमाड-इगतपुरी पॅशिंजर कसाऱ्या पर्यंत वाढवा. क) भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस मुंबई सेंटर पर्यंत वाढवा.
ड) भुसावळ-पनवेल-पुणे या गाडीला शयन यान जोडा.
वरिल गाड्यातील पर्यटन स्थळा पर्यंत धावणाऱ्या गाड्यामुळे, स्थानिक लोकांना मोठा रोजगार मिळेल. वरील सर्व मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करून त्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, वैद्यकीय राज्य मंत्री सौ भारती पवार खासदार उन्मेशदादा पाटील, श्री हेमंत गोडसे, कु.हिना गावित,श्रीमती रक्षाताई खडसे, डॉ सुभाष भामरे यांच्या कडे केली असल्याची माहिती प्रदिप अहिरे एन.एम.भामरे, ए.जी.पाटील,दिपक पाटील यांनी दिली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा