आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी तयारी आहे – मुख्यमंत्री

मुंबई : वृत्तसंस्था । पहिली लाट ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी युवा आणि मध्यमवयीन नागरिकांमध्ये आली. आता मुलांच्या गटात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण शांत बसणं शक्य नाही. लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.

दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील कोरोना कसा रोखणार? या विषयावर आज लहान मुलासांठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सशी त्यांनी संवाद साधला. राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एका गोष्टीचं मला समाधान आहे. मागील वर्षी साधरण याच दिवसांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली होती. तेव्हा कदाचित आपल्या देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आपण लवकर पावलं उचलायला सुरूवात केली. रूग्णालयं कमी पडतील. बेड्स कमी पडतील हा विचार करून आपण जम्बो सुविधा केंद्र तयार केली. तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. सर्वाधिक तयारी महाराष्ट्रात झाली.”

राज्यात कोरोनाचा कहर उच्चांक गाठत असताना देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी लॉकडाउनचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आणि त्यासाठी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की,कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. अजुन यश जरी मिळालेलं नसलं, तरी या नियंत्रणाचं सर्व श्रेय हे डॉक्टरांना आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे