कोरोनाचा महाविस्फोट: 49 हजार 447 नव्या रुग्णांची नोंद; आज राज्यात 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू!!
काल दिवसभरात राज्यात तब्बल 49 हजार 447 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 277रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 टक्के असून मृत्यूदर 1.88 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 29,53,523 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,95,315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 4,41,475 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3,67,899 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,754 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 60,846 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.जि
जळगाव जील्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. येथे बाधितांचा आकडा 89082 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 79010 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 9602 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आज झालेल्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी दोन दिवसाचा अलर्ट दिला आहे.
परंतु कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत असले तरी मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी लॉकडाऊन किंवा कठोर निर्णय लावतील हे आता नक्की झालं आहे.


