ब्रेकिंग

पाचोरा येथील राज्यस्तरीय महिला सप्ताहाचे सांगता 

पाचोरा शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय महिला सप्ताहाचे आज काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. महाराष्ट्रभरातील नामांकित महिला कीर्तनकार यांनी कीर्तन रुपी सेवा देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले.

कीर्तना सप्ताहामध्ये सात दिवसांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित महिला कीर्तनकार यांनी कीर्तन रुपी सेवा देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले सप्ताहाच्या सातव्या दिवशी संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई पाटील यांचे सुंदर असे सुश्राव्य कीर्तन झाले त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक विषय मांडले त्या विषयांमध्ये त्यांनी सांगितले की मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकण्यापेक्षा आपल्या घरात दोन जिवंत देव आहेत ते म्हणजे सासू-सासरे त्यांची सेवा करा साक्षात महादेव तुमच्या घरी अवतरल्याशिवाय राहणार नाही व तसेच आपल्या मुलींना जसे संस्कार देतात तसेच मुलांना सुद्धा संस्कार द्या मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा व संस्कारशील बनवण्याचा प्रयत्न करावा.

तसेच त्या म्हणाल्या की मी जिवंत आहे तोपर्यंत अनाथ गोरगरीब बे सहारा मुलांसाठीच त्या ठिकाणी कार्य करण्याचा प्रयत्न करेल ज्यांना कोणीही सहारा नाही अशा लेकरांना पोटच्या लेकरांपेक्षा अधिक प्रेम देईल संस्थेमधून अनेक विद्यार्थी हे कीर्तनकार कथाकार झाले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कीर्तनानंतर आपले मत व्यक्त केले त्यांनी सांगितले की ताई व महाराजांनी आम्हाला या व्यासपीठावर उभे राहून बोलण्याची शक्ती दिली व आज आम्ही महाराष्ट्रभर फिरून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कीर्तनाच्या शेवटी त्या दिवसाचे निमित्त म्हणजे 26 11 रोजी झालेल्या ताज हल्ल्यामध्ये शहीद जवानांचे साठी व डोंगराळे तालुका मालेगाव येथे घडलेल्या मुलीवर अत्याचार चा निषेध म्हणून मेणबत्ती व टॉर्च लावून निषेध व्यक्त करण्यात आला त्याप्रसंगी कीर्तनकार सुनीताताई पाटील यांनी कीर्तनामध्ये देशभक्तीपर व्याख्यान करून सीमेवर जाणारे जवान यांना मिळणारा पगार आपल्याला दिसतो पण त्यामागील वेदना आपल्याला दिसत नाही त्यांच्या वेदना सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजेल व त्यांना मानाचे स्थान आपण समाजाने द्यायला हवं असे प्रबोधन केले व देशभक्तीपर गीताने कीर्तनाचा समारोप झाला शेवटी सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक सुभाष चौधरी सर यांनी केले व आभार संस्थेचे ह भ प योगेश महाराज यांनी मानले.

किर्तन सप्ताहाच्या सांगते प्रसंगी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले व हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे