धुळे जिल्ह्यातील कुसूंबा येथील मल्हार सोसायटीच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु भेट

धूळे जिल्ह्यातील कुसूंबा येथील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकत्यांनी मल्हार सोसायटीच्या जिल्हा परिषदच्या विदयार्थ्यांनां शालेय उपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
जय मल्हार सोसायटी कुसुंबा वार्ड क्रमांक एक या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. सुनील धनजी परदेशी यांच्या संकल्पनेतून ओबीसी समाजाचे नेते श्री अँड योगेश परदेशी यांच्या उपस्थितीत तसेच गटप्रमुख ठाणे महानगरपालिका श्री राजेंद्र बारकू परदेशी माजी प्राचार्य मुंबई महानगरपालिका श्री रवींद्र बंडू परदेशी माध्यमिक शिक्षक श्री जगदीश निळकंठ परदेशी समाज नते श्री. पृथ्वीराज गढरी समाजसेवक श्री.महेंद्र गोकुळ परदेशी समाजसेवक श्री.यशवंत वाघ यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप शालेय उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आलं.
शालेय उपयोगी वस्तू वह्या, पेन, क्राफ्ट पेपर यांचे वाटप करण्यात आलं यावेळी शाळेचे शिक्षक श्री राजधर पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच तेथील ग्रामस्थ श्री.योगेश्वर मोरे आणि मोरे परिवार हे यावेळी उपस्थित होते.



