पाचोऱ्यात शिवसेनेला धक्का: माजी नगरसेवक दत्ता जडे भाजपमध्ये प्रवेश करणार..?

पाचोरा नगरपरिषद निवडणुक रंगात आली असतांना शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता जडे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपा पक्षात प्रवेश करतील अशी माहिती मिळत असून त्यांचा भाजप अधिकृत प्रवेश लवकरच होईल असे सांगण्यात येत आहे.
माजी नगरसेवक दत्ता जडे हे शिवसेनेचे एके काळी नगरसेवक होते त्यांची समाज माध्यमात एक वेगळी क्रेज आहे. दत्ता जडे हे सामान्य नागरिकांना पर्यंत सहज पोहचतात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाचोरा नगरपरिषद निवडणुकित शिवसेना पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने ते काहीसे नाराज झाल्याचे दिसत होते आणि भाजपने हिच संधी साधत डाव टाकला आहे. दत्ता जडे आपल्या समर्थकांसह हे लवकरच भाजप मध्ये डेरे दाखल होणार आहेत.
त्यांनी अलीकडे सोशल अकाउंटवर भाजपचा कमळ चिन्ह अपलोड केल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. पाचोऱ्यात भाजप पक्षाची ताकद वाढतानां दिसत आहे, नगरपरिषद निवडणुक ही निष्ठेची मानली जात आहे. कारण आमदार आणि माजी आमदार यांच्या सौभाग्यवती एक मेकांना जोरदार टक्कर देतील हे निश्चित.



