महाराष्ट्र

टिळक भवन येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार


झूम मराठी न्यूज नेटवर्क

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहिला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

आज सकाळी ११ वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा जनता दरबार संपन्न झाला. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले त्यावर तात्काळ कार्यवाही करून ते प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, चंद्रकांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, समन्वयक रविंद्र परटोले उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे