ब्रेकिंग

ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघेंना पोलिसांनी पाठवले समन्स 


 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणजे ठाण्याचे सर्वेसर्वे. एकेकाळी स्वर्गीय आनंदी दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून आनंदी दिघे ठाण्यात वावरत होते. आनंद दिघे यांची एक हाती सत्ता ठाण्यामध्ये होती. ठाणे जिल्ह्याचे सर्व निर्णय स्वर्गीय आनंद दिघेच घेत होते. संपुर्ण ठाणे शहरात दिघे साहेबांचा दरारा होता. आनंद दिघे यांनीच एकनाथ शिंदे यांना राजकारणात मोठे केले, इतके मोठे केले की ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे सत्तापालट झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बंडा नंतर अनेक राजकीय फेरबदल केले. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये केदार दिघे यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहे. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहे. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या नंतर समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलंय. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित कपूरचा शोध पोलीस घेत आहेत. याचसंदर्भात दिघेंना समन्स पाठवण्यात आले आहे. केदार दिघेंना पाठवण्यात आलेल्या समन्स मुळे केदार दिघेंना पोलिसाना सहकार्य करावे लागणार आहे. केदार दिघे यांच्या शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेताच ही कारवाई म्हणजे केदार दिघेंची राजकीय कोंडी करण्याचा डाव आहे असे शिवसैनिक म्हणत आहे. पोलीस चौकशी, इडी यासारख्या तपास यंत्रणा हाताशी धरून विरोधकांना नामोहरण करणे हा नवीन राजकीय डावपेच आहे. शेवटी पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल. पण आनंद दिघे यांच्या ठाण्यात केदार दिघेंना सध्या तरी मोठे राजकीय आव्हान उभे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे