आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
दहावीच्या परीक्षा रद्दच, मात्र बारावीच्या परीक्षा…! । वर्षा गायकवाड
मुंबई । कोरोनामुळे खोळंबलेल्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थितीत आज (२३ मे) पार पडलेली ही बैठक CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. परीक्षांसंदर्भात या पर्यायांबाबत बैठकीत चर्चा झाली असून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करु”, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

वर्षागायकवाड यावेळी म्हणाल्या की, “कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याने ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. त्यातच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख आणि CBSE च्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेता विचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच आणखी महिन्याभरानंतर एकंदर स्थिती पासून बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सुचविले आहे.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, “दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. त्याचप्रमाणे बारावीच्याही परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला आम्ही केंद्राला करणार आहोत.” तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी लसीकरण हा महत्वाचे असल्याने केंद्राने विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा”, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली आहे.



