आपल खान्देशमहाराष्ट्र

जळगावात तीन नवजात शिशूंना कोरोनाची लागण ; कुटुंबाने काळजी घेण्याची गरज!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ३ ते ४ बाधित गरोदर महिलांची प्रसूती केली जात आहे. गेल्या आठवडाभरात २० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती झाली असून, त्यापैकी तीन नवजात शिशूंना कोरोनाची लागण झाली होती. यात दोन शिशूंना ऑक्सिजन देखील देण्यात आला होता. त्यामुळे गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

 जळगाव || कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गर्भवती महिला बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ३ ते ४ बाधित गरोदर महिलांची प्रसूती केली जात आहे. गेल्या आठवडाभरात २० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती झाली असून, त्यापैकी तीन नवजात शिशूंना कोरोनाची लागण झाली होती. यात दोन शिशूंना ऑक्सिजन देखील देण्यात आला होता. त्यामुळे गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोना संसर्गाची प्रत्येक वयोगटात दहशत आहे. गर्भवती महिलांवर देखील कोरोनाच्या भीतीचे दडपण आहे. दरम्यान, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गर्भवती महिला बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नवजात शिशूंना देखील कोरोनाची लागण होण्याची भीती वाढते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज ३ ते ४ बाधित महिलांची प्रसूती केली जात आहे. या सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र आठवडाभरात बाधित महिलांनी जन्म दिलेल्या तीन नवजात शिशूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन बालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. तर एका बालकाची प्रकृती नॉर्मल होती. दरम्यान, या तिन्ही बालकांचा दुसऱ्यांदा घेतलेला स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पहिल्या लाटेत केवळ एकच बालक होता पॉझिटिव्ह

पहिल्या लाटेत गर्भवती महिला बाधित होण्याचे प्रमाण कमी होते. आठ महिन्यात जीएमसीत ६० पेक्षा अधिक बाधित महिलांची प्रसूती झाली होती. मात्र, यापैकी फक्त एकच बालक बाधित झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले अाहे. त्यामुळे या काळात प्रत्येक गरोदर स्त्रीने स्वत:ची आणि बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे