ब्रेकिंग

 ”शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?”, शिंदेंचा नेता ‘हे’ काय बोलून गेला?


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर कडाडून टीका केली. यावेळी शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. दरम्यान अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या या टिकेवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली.

अमित शहा यांनी पुण्यात बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असून त्यांनी सरकारमध्ये असताना भ्रष्टाचाराचे संस्थात्मकीकरण केल्याचा आरोप केला अमित शहा यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी सवाल उपस्थित केला की, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असतील ते विसरभोळे आहेच बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर अंगलट येते. असा खोचक टोला देखील बच्चू कडूंनी शहा यांना लगावला. तसेच पुढे बोलताना, शरद पवार भाजप सोबत जाणार नाही. अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्या सोबत जाऊ नये असेही बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. गृहमंत्री ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत त्यांना याच मोदी सरकारने पद्म विभूषण देऊन गौरव केला आहे. भाजप ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यामधील जास्ततर आज भाजपमध्ये आहेत. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, शहा यांचं विधान ऐकून मला हसू आलं, कारण याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्म विभूषण देऊन सन्मानित केले होते. अमित शहा यांचा मागे कार्यक्रमात अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. म्हणूनच भाजपने ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्यापैकी ९० टक्के लोक आज वॉशिंग मशीनमुळे भाजपमध्ये आहेत.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की भाजपने एकदा ठरवावे की शरद पवार अखेर काय आहेत? दुसरी गोष्ट ते १२ नेते ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सर्व आज महाराष्ट्रा सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भाजपने आधी निश्चीत करावं की या देशात भ्रष्टाचारी कोन आहे? भाजप कदाचीद याबद्दल कन्फूज आहे कारण त्यांच्याच सरकारने पवार साहेबांना सन्मानित केले होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे