आपल खान्देश

पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघासाठी मतदान शांततेत पार पडले.

सकाळी मतदारांची गर्दी कमी असली तरी दुपारनंतर मात्र मतदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली मोठ मोठया रांगा लागलेल्या दिसल्या.

  • दिलीप जय परदेशी.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (दि.२०) मतदान शांततेत पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतदानाची अधिकृत टक्केवारी येण्यास होती. तरीसुद्धा सरासरी 68.70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदान केंद्रावर महिलाची सरासरी पेक्षा टक्केवारी जास्त दिसली असून नवमतदारांसह वृद्ध, महिला, दिव्यांग यांनी मतदान केले.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी 12 उमेदवार असून 333851 मतदारांची संख्या आहे. 355 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 7 ते सकाळी 9 वाजतापर्यंत  मतदारसंघात 2.89 टक्के मतदान झाले होते. सकाळी 11 वाजतापर्यंत टक्केवारीत वाढ होऊन ती 8.53 टक्क्यांपर्यत पोहोचली. दुपारी 1 वाजतापर्यंत  17.95 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 वाजतापर्यंत ही टक्केवारी 31.37 वर पोहोचली होती. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 48.05 टक्के मतदान झाले. काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदार असल्याने मतदानाची प्रक्रिया सुरूच होती. एकूण 3,33860 पैकी 2,29377 एवढे मतदान झाले असून त्यामुळे सरासरी 68.7 टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हिवाळ्याचे दिवस असल्याने दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत अचानक वाढ होत गेली. सकाळी मतदारांची गर्दी कमी असली तरी दुपारनंतर मात्र मतदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली मोठ मोठया रांगा लागलेल्या दिसल्या. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत नवमतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.

गत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत नवमतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. अनेक नवमतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदानात सहभाग घेतला. मतदान केंद्रावर नवमतदारांसह वृद्ध, महिला, दिव्यांग सहभाग दिसून आला. वृद्ध व दिव्यांगांना व्हिलचेअरच्या मदतीने मतदान केंद्रात आणले गेले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी, मतदारांमध्ये जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले.

  • शनिवारी २३ नोव्हेंबरला मतमोजणी..

आज २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरू होईल. पाचोरा मतदारसंघाची मतमोजणी पाचोरा शहरातील गिरड रोड वरील स्टोन्ग रूम वर मतमोजणी होणार आहे त्या दिवशी वाहतुकीत बदल राहणार असून सर्व शेतकरी वर्ग व वाहनचालकांनी नोंद घ्यावी.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे