ब्रेकिंग

पाचोऱ्यात किशोरआप्पाची हवा, पाचोरा भडगाव विधानसभा हॅटट्रिक कडे कूच, यांचा करिश्मा चालला नाही..!

दिसतोय फरक किशोर आप्पा परत हे खरं ठरलं...


राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून पहिल्या फेरीत पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे किशोरआप्पा पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यांचा शेवट पर्यत आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 मागील निवडणूक पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता असून 10 हजार मताधिक्याने निवडून येणार असा निकाल सांगत आहे. अपक्ष उमदेवार अमोल शिंदे यांचा करिष्मा चालला नाही आणि महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमदेवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रसिद्धीची लाट चालली नाही, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना मराठा फॅक्टरनं तारलेच नाही, सर्वच्या चक्रव्हिवातून नेम साधत, धनुष्य हाती घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हॅटट्रिक करून दाखवली, दिसतोय फरक किशोर आप्पा परत हे खरं ठरलं.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव मतदार संघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते महायुतीचे उमदेवार आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पहिल्या फेरी पासून आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं असून, चित्र लवकरच स्पष्ट होईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे