आपल खान्देश

पाचोरा शहरातील समर्थ नगरच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) शुक्रवारी सायंकाळी पावसाने पाचोरा शहरासह अन्य परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस पडल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असल्याचे चित्र जागोजागी पहायला मिळत आहे. भडगाव पाचोरा रोड स्वप्नशिल्प होटल जवळील समर्थ नगरातील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिक त्रस्त झालेत.

भडगाव पाचोरा रोड वरील स्वप्नशिल्प होटल जवळील समर्थ नगरातील रस्त्यावर दरवर्षी पाऊस पडल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचते आणि रस्ताला तळ्याचे स्वरूप येत असते त्यामुळे येण्या जाण्याचा रस्ता बंद होतो. तेथे जवळच वीज रोहित्र डीपी आहॆ व त्या साचलेल्या पाण्यात सर्प, बेडूक निघातात त्यामुळे परिसतील राहणारे नागरिक त्रस्त आहेत.

पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने पाऊस थांबला तरी या मार्गावर पावसाचे पाणी आहे तसेच साचून राहते. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पावसाच्या साचलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरीकांतून जोर धरत आहे. तरी प्रशासनाने लवकर लक्ष न दिल्याने मोठा अनर्थ घडू शकतो.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे