राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु होणार ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती..
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई (झूम मराठी) देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रसार होत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एकदा नव्या शैक्षणिक वर्षाअंतर्गत राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुले शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. तसेच बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना म्हणाल्या कि, बारावीचा निकाल लवकरच लागेल अस त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे म्हणाल्या कि, स्वजीवी उपक्रम सुद्धा आम्ही सगळ्या सरकारी शाळांमध्ये सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या बाबतीत शिक्षण मिळणारा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. काही देशांशी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात करार करणार आहोत. आपल्या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शिकता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेतच आपल्या आवडीचं शिक्षण मिळावे, यासाठी हे काम आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं.



