ब्रेकिंग

राज्यात कोरोनाचा महा-कहर

काल दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यात सर्वाधिक असे एकाच दिवसात ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात रोज नवे उच्चांक गाठले जात असून आज दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाले तर आजपर्यंतचे सर्वोच्च ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा एक प्रकारे कोरोना संसर्गाचा आता अतिउद्रेक झाला आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी सुरू झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे.एका बाजूला विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपामुळे आघाडी सरकार अस्थिर असताना राज्य शासनासमोर करोना संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

काल दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यात सर्वाधिक असे एकाच दिवसात ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.ही गेल्या काही दिवसातील सर्व आकडेवारी असून सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,२५,९०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे