ब्रेकिंग
ढगफुटींच्या ‘हिटलिस्टवर’ महाराष्ट्र? येत्या काळातही महाराष्ट्राला ढग फूटींचा सामना करावा लागेल प्रा.किरणकुमार जोहरे
निलेश पाटील – कार्यकरी संपादक
अलर्ट : येत्या काळातही महाराष्ट्राला ढग फूटींचा सामना करावा लागेल प्रा.किरणकुमार जोहरे
नाशिक ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री व जागतिक हवामान संघटनेला दिली महाराष्ट्रातील १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची माहिती१०१ पेक्षा जास्त ढगफुटींच्या महापूराने कोसळला महाराष्ट्र!
ढगफुटींच्या ‘हिटलिस्टवर’ महाराष्ट्र!
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ व हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे संशोधन निष्कर्ष व वैज्ञानिक विश्लेषण
डॉप्लर रडारने ढगफुटींची अचूक सुचना देणे शक्य:आंतरराष्ट्रीय ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे
डब्ल्यूएमओच्या मापदंडानुसार १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली माहिती!
मान्सून पॕटर्न बदलतोय; जून मध्येच प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला होता अलर्ट!
डब्ल्यूएमओनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ‘ढगफुटी’आणि येणारे पूर म्हणजे ‘फ्लॅशफ्लड’!
पुणे/कोल्हापूर /औरंगाबाद /नाशिक :
महाराष्ट्र राज्यात कमी वेळात झालेला पाऊस म्हणजे वर्ल्ड मेटियरोलाॅजीकल आॅर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) च्या जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या मापदंडानुसार ढगफुटी (क्लाउडबस्ट) आणि आलेले पूर म्हणजे फ्लॅशफ्लड असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी व हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री निर्मला सितारमन, भारत हवामान शास्त्र विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) आदींबरोबरच वर्ल्ड मेटियरोलाॅजीकल आॅर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) अर्थात जागतिक हवामान संघटनेला थेट संपर्क साधून महाराष्ट्रातील दोन दिवसात झालेल्या १०१ पेक्षा जास्त ढगफुटींची त्यामुळे निर्माण झालेले महापूर यादी आणि याबाबतीत संशोधन निष्कर्ष तसेच वैज्ञानिक विश्लेषण आदी माहिती मानवजातीच्या कल्याणासाठी , राष्ट्रीय हितासाठी व जनहिताकरीता भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी कळविली आहे.
ढगफुटींच्या ‘हिटलिस्टवर’ महाराष्ट्र? येत्या काळातही महाराष्ट्राला ढग फूटींचा सामना करावा लागेल प्रा.किरणकुमार जोहरे https://t.co/OG7OhJ76Wx
— ZOOM MARATHI (@DileepPardeshi) July 28, 2021
आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे १५ मिनिटात २५ मिलीमिटर किंवा एक इंच किंवा ३० मिनिटात ५० मिलीमिटर किंवा दोन इंच किंवा ४५ मिनिटात ३ इंच किंवा ७५ मिलीमिटर किंवा एक तासाच्या कालावधीत १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक दराचा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. भारत हवामान विभाग (आयएमडी)च्या वेबसाईटसह २०१० सालापर्यंत उपलब्ध असणार्या व्याख्येनुसार १०० मिलीमीटर प्रतीतास या दराने कोसळणार्या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्लाउडबस्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक शोधनिबंध व अहवालात आहे. डेन्मार्क, यूके, यूएस, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतासह इतर अनेक देशांतील संशोधक ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबर्स्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोधनिबंधात करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जातो अशी माहिती देखील भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.
महाराष्ट्रात गुरुवार व शुक्रवार या अवघ्या दोन दिवसात १०१ पेक्षा जास्त ढगफुटीं झाल्याची माहिती भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. कोकण, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सर्व ठिकाणी ढगफुटी या दोन दिवसात झाल्यात. प्रा किरणकुमार जोहरे हे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) पुणे चे माजी हवामान शास्त्रज्ञ असून ४ आॅकटोबर २०१० रोजी पाषाण पुणे येथे झालेल्या ढगफुटीची ९० मिनिटात १८२ मिलीमिटर पाऊस) सुचना प्रशासनाला देऊन त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले होते. ज्याची दखल आजही आंतरराष्ट्रीय सायंटिफिक कम्युनिटी विविध रिसर्च पेपर, सायंटिफिक बुक्स व इतर सायंटिफिक लिट्रेचर मध्ये विविध भाषेत घेतली जात आहे.




