आपल खान्देश

पाचोऱ्यात शेतकरी मेळावा मोठया उत्साहात सपन्न.

पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) पाचोराशहरातील आदर्श कृषी सेवा केंद्राच्या स्थापनेला आज ५० वर्षे पूर्ण झाली असून याचे औचित्य साधून आज माता कैलादेवी मंदिराच्या परिसरातल्या सावा मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या मेळाव्यात मोठया संख्येने शेतकरी जमले होते.

कार्यक्रमात शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते तथा प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या ओजस्वी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले. यानंतर आदर्श कृषी सेवा केंद्र तसेच निर्मल सीडस परिवाराच्या वतीने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला

शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही,कापसाला सोयाबीनला भाव मिळत नाही,पुरेशी वीज मिळत नाही,नुकसान भरपाई मिळत नाही मग आमचा शेतकरी कसा जगेल आज त्याची अवस्था फार बिकट आहे.त्याची शेती पिकेनाशी झाली. उत्पादन खर्च भरपूर वाढला, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जेव्हा आमचा शेतकरी पूर्णतः खचून जातो तेव्हा हे सरकार फक्त पंचनामाचे नाटक करते, भयमुक्त समग्र विकासाचे व्हिजन मांडले. तात्यासाहेबांचे विचार व संस्कार मी पुढे घेऊन जातांना टक्केवारी, भ्रष्टाचार, दडपशाही यांना जरा देखील थारा देणार नाही. मतदारसंघाचा समग्र विकास करण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे भाषणात शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी सांगत होत्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे