आपल खान्देशसखी
भडगाव येथील तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश…
भडगाव येथे शिवसेना पक्षाच्या विचारांवर व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला यावेळी सर्व तरुणांचे पाचोरा भडगाव ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी पक्षात स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीच्या आधी पाचोरा भडगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटात मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश सुरु आहेत, विधानसभेचे जागावाटप सुरु असताना ठाकरे गटातुन या मतदार संघात मविआघाडी ठाकरे गटाला जागा सुटणार असे मानले जात आहे, माजी आमदार दिवंगत आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार त्याचा फायदा पक्ष प्रवेशमुळे होणार.



