आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्रविदर्भ

मेघालयाचे राज्यपालांकडून मेंढपाळ धनगरांच्या समस्यांची दखल..

राज्यपाल तथा धनगर समाजाचे कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते महामहीम मा. चंद्रशेखर एच विजयशंकरजी यांनी मेंढपाळ धनगरांच्या जंगलातील राहुटीवर प्रत्यक्ष भेट दिली. मेंढपाळ धनगरांच्या समस्या त्यांच्या वाड्यावर जाऊन समजून घेतल्या.

मेंढपाळ समुदायाची सर्वात मोठी समस्या ही चराईक्षेत्राचे नवनवीन जाचक नियमामुळे वनक्षेत्रातील त्यांच्या अधिवासावर कसा प्रतिबंध आहे समस्या मांडताना ज्ञानेश्वर परदेशी


  • दिलीप जय परदेशी

अमरावती (झूम मराठी) मेघालय राज्याचे राज्यपाल तथा धनगर समाजाचे कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते महामहीम मा. चंद्रशेखर एच विजयशंकरजी (Chandrasekhar H Vijayashankar) यांनी मेंढपाळ धनगरांच्या जंगलातील राहुटीवर प्रत्यक्ष भेट दिली. मेंढपाळ धनगरांच्या समस्या त्यांच्या वाड्यावर जाऊन समजून घेतल्या. मेंढपाळ धनगर बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. महामहिम राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील भटकंती करणाऱ्या (Shepherd Dhangar Samaj) मेंढपाळ धनगरांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी बैठक घेतली.

अमरावती ही देवांची राजधानी आहे. या पवित्र भूमीत आल्याचे मला समाधान वाटते. भारतासारखी महान संस्कृती जगात कुठेही नाही. आपण प्रत्येक महिलेला देवीचे रूप मानतो. या शहरातही अंबादेवी, एकवीरा देवीचे वास्तव्य आहे. येथील रहिवासी हा पुण्यवान असल्याचे मत मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर यांनी गुरुवारी मांगीलाल प्लॉट येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा शिवारातील सोमाजी पोकळे यांच्या राहुटीला भेट दिली. तेथेच त्यांनी मेंढपाळ धनगरांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच राहुटीत जेवणही केले. यावेळी बोलताना ३ हजार वर्षांपासून मेंढपाळ धनगर हा शेळीमेंढींचे पालनपोषण करत सतत भटकंती करत आला आहे. चराईक्षेत्र नसणे ही त्यांची सर्वात मोठी समस्या असून, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत. त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे मेघालयचे राज्यपाल म्हणाले. त्यानंतर मांगीलाल प्लॉट येथील कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. येथे धनगर विकास मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी धनगर समाजाची व्यथा समजून घेण्यासाठी मेघालयचे राज्यपाल आले. त्यामुळे धनगर समाजाचा उत्साह वाढल्याची भावना व्यक्त केली. त्याचवेळी डॉ. विकास महात्मे यांनी राज्य शासनाने धनगरांसाठी १ हजार कोटींची योजना आणल्या. परंतु, पूर्णपणे त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. सोबतच मेघालयच्या राज्यपालांद्वारे आम्ही धनगरांचे आरक्षण व समस्यांबाबत राज्य शासनासोबत समन्वय साधणार असल्याचेही सांगितले. धनगरांना एसटी आरक्षण मिळावे तसेच त्यांच्या समस्यांवर उपाय शोधता यावेत, यासाठी मेघालयचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत, कारण दोघांमध्येही स्नेहाचे संबंध आहेत, अशी माहिती दिली. सावंगा विठोबा शिवारात सोमाजी पोकळे यांच्या राहुटीत मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर यांनी जेवण केले. तेथे त्यांचे स्वागत माजी खा. डॉ. विकास महात्मे, धनगर विकास मंचाचे अध्यक्ष संतोष महात्मे  यांनी केले.

तसेच धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे सर्व प्रदेश पदाधिकारी , अध्यक्ष, सचिव, मोठया संख्येने उपस्थित होते.सर्वांनी संवाद साधला, महामाहीम राज्यपाल साहेबानी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असलेला संबंध विशिद केला, सर्वाना मेघालाय येथे येण्याचे निमंत्रण दिले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे