आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्र

गोरगरीब मेंढपाळाकडून अन्यायकारक रीतीने वसुली करणाऱ्या पीक संरक्षक सहकारी सोसायटी करतेय वसुली..

अन्यायकारक रीतीने वसुली विरोधात कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

  • दिलीप जय परदेशी

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात गोरगरीब मेंढपाळ लोकांकडून शिवार चराई च्या नावाने अन्यायकारक जुजबी वसुली करणाऱ्या पीक संरक्षक सहकारी सोसायटी मेहूनबारे या संस्था वर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

या आशयाचे निवेदन सकल धनगर समाज, चाळीसगाव यांचे वतीने मा. तहसीलदार आणि मा. सहाय्यक निबंधक, चाळीसगाव यांना देण्यात आले. पीक संरक्षण सोसायटी मेहूनबारे, तालुका चाळीसगाव या संस्थेचा नोंदणी क्रमांक १२०३५ व नोंदणी दिनांक ३० ऑगस्ट १९४७ आहे. सदर संस्थेचे मुख्य कार्य शिवारातील शेत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे, पिकांचे झाडाझुडपांचे, इलेक्ट्रिक पंपाचे, इतर मालमत्तेचे चोर व सुनाट गुरांपासून संरक्षण करणे आहे. त्या कामी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करणे, पिकांच्या संरक्षणासाठी रखवालदार नेमणे व जरुरीनुसार भाले, लाठ्या इत्यादी विकत घेणे व त्यांना पुरवणे या उद्देशासाठी संस्था स्थापन करण्यात आली होती आणि आहे, असे असताना संस्थेने दिनांक २७.०९. २०२३ ठरावानुसार, धनगर व काठेवाडी यांना चराई देऊन, शिवारात चालतीचे वाडे मेहूनबारे शिवारात आल्यास १ दिवसासाठी ५०० रुपये शिवार चराई पावती करावी असा अन्यायकारक ठराव पारित केलेला आहे. गोरगरिब मेंढपाळांकडून त्यांना शिवार चरायची पावती न देता, कोणाकडून २०० रुपये कुणाकडून ९०० रुपये घेतले जातात. त्याबाबत विचारले असता, उद्धटपणे आणि उरमटपणे उत्तरे दिली जातात. प्रसंगी पैसे देण्यास नकार दिला असता शेळ्या मेंढ्या पळवल्या जातात. तर कधी अर्वाच्या भाषेत शिविगाळ करून मारहान देखील केली जाते. असे प्रकार सर्रास होत आहेत. गोरगरीब मेंढपाळ लोकांचे चालतीचे वाडे आल्यास, त्यांच्याकडून वर नमूद केल्याप्रमाणे बेकायदेशीर रित्या शिवार चराई नावाने अन्याय कृतीने वसुली करण्यात आलेली होती व आहे. तरी सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक , मेहुनबारे यांना दिनांक 3 जुलै 2024 रोजी लेखी तक्रार देऊन देखील , अद्यापपावतो कोणतेही कारवाई केलेली नाही एकंदरीत सदर अवैध वसुली करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार पोलीस प्रशासन करीत आहे. 

वास्तविक पाहता सोसायटीच्या मालकीची एक गुंठा जागा नसताना, सोसायटी बेकायदेशीर रित्या शिवार विक्री करते. तसेच मेहुनबारे ग्रामपंचायत मालक असलेल्या जागेची देखील सोसायटी विक्री करते .तसा त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार कधीच नव्हता व नाही. तसेच या बाबतीत त्यांनी शासनाकडून परवानगी देखील आजतागायत घेतलेली नव्हती व नाही. तसेच सोसायटीचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी संस्थेचे मयत तसेच गैरहजर सदस्यांच्या खोट्यासह्या करून खोटे प्रोसिडिंग बुक तयार केलेले होते व आहे. 

सदर संस्थेविरुद्ध शिवार चरायचे नावाखाली सुरू असलेली अन्यायकारक वसुली तात्काळ थांबविण्यात यावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी. असे न झाल्यास पुढील सात दिवसाचे आत मेहूनबारे राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव तालुका धनगर समाजाच्या वतीने शेळ्या मेंढ्यांसहित रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन जबाबदार राहील. 

निवेदनावर संदीप लांडगे, संजय गढरी, परमेश्वर आबा रावते, देवचंद अण्णा साबळे, विशाल धनगर, देविदास हाटकर, देविदास वाघ, राहुल आगोने, चेतन मोरे, राजू वाघ, भोजू जाधव, गणपत जाधव, नाना शेलार, काळू जाधव, चींधा शेलार, भटा जाधव, राजू जाधव, किसन जाधव, प्रशांत असबे,भारत जाधव, चिंतामण शेलार, बारकू जाधव, सागर कामने , हिम्मत देवरे इत्यादी लोकांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे