महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

झूम मराठी न्यूज नेटवर्क

कल्याण: डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या चार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या मंगळवारी देखभाल, दुरुस्ती, यांत्रिकी, विद्युत कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.

डोंबिवली, कल्याण, टिटवाळा शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशु्द्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. नेतिवली केंद्रातून डोंबिवली शहराला, टिटवाळा केंद्रातून टिटवाळा, मांडा भागाला पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित केंद्रांमधून कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा केला जातो. दररोज या केंद्रांमधून ३४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा शहरांना केला जातो. पाऊस सुरू झाल्यानंतर या केंद्रांमध्ये तांत्रिक, विद्युत बिघाड झाल्यानंतर पालिकेला या ठिकाणी काम करणे अवघड जाते. त्यामुळे तातडीने ही कामे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे