महाराष्ट्र

मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो अपघातात सलमान आणि फिरोज ठार!!

मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो अपघातात दोघांचा मृत्यू, वाहतुकीचा झाला खोळंबा.

शरण खन्ना –ठाणे जिल्हा प्रतिनिधी 

ठाणे दि ८ नोव्हेंबर : कोंबडयांची वाहतूक करणा:या टेम्पोचा मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे,खारेगावजवळ रविवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पोचालक सलमान खान (३४) याच्यासह क्लिनर फिरोज खान (३२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे या महामार्गावरील ठाण्याकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर जवळपास एक तासांनी वाहतुक सुरळीत होण्यास सुरुवात झाली.

सलमान हा फिरोज याच्यासह कोंबड्यांनी भरलेला टेम्पो घेऊन नाशिक हुन ठाण्यात येत होता. याचदरम्यान ठाण्यातील खारेगाव जवळ तो टेम्पो पुढे असणार्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पो चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच, ठाणो महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, कळवा वाहतूक पोलीस आणि अगिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

चालक आणि क्लिनरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघातामुळे वाहनांमधील तेल रस्त्यावर सांडले होते. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. सुमारे एक तासाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर ठाण्याकडे येणारी वाहतुक सुरळीत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे