गणपती मंदिर परिसरात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या प्रकरणी मंदिराची तीन सेवकांना अटक!!
कल्याण शिळफाट्यापासून जवळच असलेल्या घोळ गणपती मंदिराच्या परिसरात मंदिराच्या पायऱ्यां लगतच्या खडीवर एका महिलेचा निर्जीव मृतदेह मंगळवारी आढळून आला होता
नवी मुंबई | सहा जून रोजी बेलापूर गावातील 30 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी डायघर मंदिरातून तीन साधूंना ताब्यात घेतले आहे. ती महिला घरातून गायब झाली. बेलापूर गावातील रहिवासी अक्षता कुणाल म्हात्रे असे मृत महिलेचे नाव असून ती 6 जून रोजी वैयक्तिक भांडणातून घरातून निघून गेली होती. कोपरखैरणे हे अक्षता म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे घर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षता म्हात्रे ही 6 जुलै आणि दर शनिवारी मंदिरात जात होती. ती परत न आल्याने तिच्या पतीने तिच्या आई-वडिलांना फोन करून विचारपूस केली, पण ती आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर, तिचा नवऱ्याने कुणाल म्हात्रे यांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार एनआरआय कोस्टल पोलिसांकडे केली.
तसेच कल्याण शिळफाट्यापासून जवळच असलेल्या घोळ गणपती मंदिराच्या परिसरात मंदिराच्या पायऱ्यांलगतच्या खडीवर एका महिलेचा निर्जीव मृतदेह मंगळवारी आढळून आला. हे मंदिर शिळफाटा जवळ डोंगरावर आहे. तेथील स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर शिळ डायघर पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बरगडी फ्रॅक्चर, पाठीवर खरचटणे, गळा दाबून मारल्याच्या खुणा आणि डोक्याला दुखापत होते.
पोलीस तपासात
कळवा शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे डोके जमिनीवर आपटून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील शाम सुंदर शर्मा(वय 62), संतोषकुमार मिश्रा (वय 45), राजकुमार पांडे (वय 45) या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तीन पोलीस पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मंदिर परिसरात सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणून सखोल चौकशी केली असता, मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीने त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर शीळ डायघर पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात चौकशी केली असता, मृत महिलेच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे (वय 30) घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता ती शीळ गाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात वरील आरोपी दारू पीत बसले होते. सदर महिला एकटी असल्याने तिच्या परिसरात हे आरोपी दारू पीत बसले होते.
दरम्यान, महिला एकटी असल्याने तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी सदर महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींवर कारवाई केली आहे.



