ब्रेकिंग

विधानसभा निवडणूक लढणारच, माजी आमदार दिलीप वाघ यांनी फायनल केले..

  • दिलीप जय परदेशी

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता साऱ्‍यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक आणि भावी आमदारांची संख्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसने मतदारसंघात आपला दावा केला आहे. ही विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक घड्याळ हाती घेऊन निवडणूक लढणारच असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी फायनल केले आहे. 

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात इच्छुक आणि भावी आमदार होणाऱ्यांची संख्या अधिक आहे मागील काही दिवसापासून महाआघाडीतुन काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी व ठाकरे गटातून शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी विधानसभा मतदारसंघात दावा केला असून महायुतीतुन शिवसेना विद्यमान आमदार किशोर पाटील, भाजपचे अमोल शिंदे, आता राष्ट्रवादीतुन दिलीप वाघ यांनी बांबरुड राणीचे येथे पत्रकार परिषद घेऊन  विधानसभा निवडणूक लढणारच अशी डरकाळी फोडली असून यावर्षी राजकीय समीकरण बदलणार असे दिसत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

????

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे