आपल खान्देशराजकीय

भडगावातील असंख्य युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

 भडगाव शहरातील असंख्य युवकांचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी पक्षात दाखल होत आहेत. या अनुषंगाने आज भडगावातील युवकांनी पक्षात प्रवेश घेतला.

दरम्यान या पक्षप्रवेश कार्यक्रमाला गणेश परदेशी, उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, मनोहर चौधरी, गोरख पाटील, बालू तात्या पाटील, जे.के.पाटील, राजू मोरे, मच्छिंद्र पाटील, पप्पू दादा, भैय्या पाटील, नंदलाल पाटील, सुनिल पाटील, अरुण नाना पाटील, योजनाताई पाटील, डी.डी. पाटील सर, शाम सर, युवासेना उपजिल्हाप्रमुख माधव जगताप, तालुकाप्रमुख चेतन पाटील, शहरप्रमुख चेतन रंगनाथ पाटील, संदीप ठाकरे, रोनीत आहिरे, हितेश मारवाडी, भैय्या सूर्यवंशी, नवल राजपूत, सनी पाटील, अमोल पाटील, नितीन बाविस्कर यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे