आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

धुळ्यात मतदान केंद्रावरील आपल्या शिक्षक भावांसाठी धावल्या शिक्षक नेत्या शुभांगी ताई पाटील..

आपल्या शिक्षक भावासह मतदान केंद्रावरील कर्मचारी बांधवांना ताईंनी आपल्या संवेदनशील मनाचा परिचय दिला. 


इलेक्शन कर्तव्य आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावत असताना, मतदान केंद्रावर असलेले शासकीय कर्मचारी, शिक्षक बांधव यांच्यावर मतदान केंद्रात दाखल झाल्यापासून तर सायंकाळी मतदान संपल्यानंतर देखील मतदानाची सर्व आकडेवारीचे कागदपत्रे पूर्ण करून ते मुख्य कार्यालयात सादर करेपर्यंत थांबावे लागते. या काळात त्यांना चहा, पाणी नाश्ता, जेवण याची व्यवस्था शासकीय पातळीवर होत असते.

परंतु काही वेळा शासकीय व्यवस्था तोकडी पडते किंवा वेळेवर मिळत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येते. कारण मतदान केंद्रावर असलेले शिक्षक,कर्मचारी, पोलीस अधिकारी, हे बाहेर गावावरून बाहेर जिल्ह्यातून आलेले असतात. त्यांना वेळेवर चहा, पाणी नाश्ता, जेवण मिळावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. परंतु लोकसभा निवडणुकीचा व्याप हा खूप मोठा असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी ही व्यवस्था पार कोलमडलेली होती! त्यावेळी केंद्रावर असलेले बहुतांश कर्मचारी हे शिक्षक व इतर खात्यातील कर्मचारी होते व या कर्मचाऱ्यांनी सदरची बाब शुभांगी ताई पाटील यांना निदर्शनास आणून दिली आणि शुभांगी ताई यांनी देखील ताबडतोबिने त्याची दखल घेऊन धुळे शहरासह देवपूर , जुने धुळे आदी मतदान केंद्रांवर भेटी देऊन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह स्वतः शिक्षकांना नाश्ता व चहा पाणी देण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी दुपारच्या जेवणाची देखील व्यवस्था केली. सकाळी सात वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत शुभांगी ताई पाटील यांनी स्वतः धुळे शहरातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊन स्वतः व आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांना चहापाणी जेवण पुरवण्याचे काम करून शिक्षकां प्रति आपल्या सहृदय तेचा परिचय दिला. आणि आपल्या शिक्षक भावासह मतदान केंद्रावरील कर्मचारी बांधवांना ताईंनी आपल्या संवेदनशील मनाचा परिचय दिला.

यावेळी त्यांच्यासह त्यांचे पती अँड. विवेक सूर्यवंशी, प्रा जसपाल सिंह सिसोदिया, चेतन देसले, यश निकम आदी उपस्थित होते., 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे