आपल खान्देशमहाराष्ट्रसखी

जळगाव | मायलेकांचा मृत्यू खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप..

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरुद्ध नातेवाईकांचा संताप

जळगाव (प्रतिनिधी) प्रसुती झालेल्या मातेने नवजात गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावून दोन दिवस होत नाही तोच श्रद्धा जयेश सूनसोतकर (वय २८, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) या मातेचाही सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, दोघं मायलेकांचा मृत्यू खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • बाळाची नाळ कापल्यानंतर काही वेळताच दुर्देवी मृत्यू !

जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे श्रद्ध सूनसोतकर या महिला वास्तव्यास असून त्या गर्भवती होत्या त्यांना दि. ४ जून प्रसूती तारीख दिली होती. दि. १८ मे रोजी तिला उपचारासाठी तारा हॉस्पिटल येथे तिचे पती जयेश यांनी नेले. नातेवाईकांना पूर्व सूचना न देता तिची दुपारी २ वाजता सोनोग्राफी केली. त्यानंतर तिला अॅडमिट करण्याचे सांगितले. त्यानुसार जयेश सूनसोतकर यांनी पत्नीला त्याठिकाणी दाखल केले. दुपारी सव्वा दोन वाजता त्या महिलेचे सिझर केल्यानंतर त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु बाळाची नाळ कापल्यानंतर त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याचा काही वेळताच दुर्देवी मृत्यू झाला. मात्र बाळाच्या आईची प्रकृती ठिक असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

अचानक महिलेची प्रकृती खालावली ! मध्यरात्री खालावली महिलेची प्रकृती दोन तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती चांगली होईल असे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक महिलेची प्रकृती खालावली. यावेळी तारा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास महिलेला अन्य ठिकाणी दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी रविवारी पहाटे पाच वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत ! जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचाराला महिलेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महिलेस छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईकांनी जवळच दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी महिलेवर उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास महिलेची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरुद्ध नातेवाईकांचा संताप ! उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता या ठिकाणी तारा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे