महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मिड ब्रेन एक्टिवेशन चा भांडाफोड!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे
मिड ब्रेन एक्टिवेशन चा भांडाफोड
आज दुपारी मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मिड ब्रेन एक्टिवेशन चा भांडाफोड करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोळकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.
बीड ब्रेन एक्टिवेशन च्या नावाखाली आर्थिक शोषण केले जाते छद्म विज्ञान आहे केबीसी सारख्या शो मध्ये अमिताभ बच्चन सारखी व्यक्ती सुप्रसिद्ध व्यक्ति जेव्हा त्याचं कौतुक करते तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार प्रचंड वेगाने होतो आणि ही बाब अतिशय गंभीर आहे.

या पाठीमागचे आर्थिक गणित, छद्म विज्ञान , पालकांची मानसिकता या माध्यमातून मुलांचे होणारं शोषण तान तनाव अशा सगळ्याच गोष्टी अनेक उदाहरणांसह पत्रकारांसमोर सविस्तरपणे मांडल्या.
बीड ब्रेन एक्टिवेशन च्या नावाखाली आर्थिक शोषण केले जाते छद्म विज्ञान आहे केबीसी सारख्या शो मध्ये अमिताभ बच्चन सारखी व्यक्ती सुप्रसिद्ध व्यक्ति जेव्हा त्याचं कौतुक करते तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार प्रचंड वेगाने होतो आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणूनच अशा अशा प्रकारच्या छद्म विज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला तातडीने आळा बसावा म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
ज्या पत्रकार परिषदेत श्री राजू कोळी आणि श्री स्वप्नील शिरसाट यांनी कुठलेही मिड ब्रेन एक्टिवेशन चे थोटांड न करताही या गोष्टी कशा सहज घडवल्या जातात याचे प्रात्यक्षिक सर्व पत्रकारां समोर करून दाखविले व मीड ब्रेन ॲक्टिवेशन च्या नावाखाली कसे फसविले जाते हे सहप्रयोग समजावून सांगितले. त्याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
या कार्यक्रमाच्या संदर्भात केबीसी च्या संयोजकाची शी संपर्क साधला जाईल व त्याचा निषेध नोंदवला जाईल. त्याचबरोबर अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी पत्रव्यवहार केले जातील असे समितीतर्फे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला अँड मुक्ता दाभोळकर यांच्यासोबतच अनिस वार्तापत्राचे संपादक श्री राजीव देशपांडे , राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख हेही प्रामुख्याने उपस्थित होते.


