महाराष्ट्र

राज्यभरातील सर्व शाळांमध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान’ सुरु

मुंबई :- संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती ,पंथ,धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता,न्याय ,समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. राज्य घटनेच्या मसुदा समितीनं संविधान तयार करुन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत मांडत देशाला अर्पण केले. राज्य घटनेच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं. 26 नोव्हेंबरच्या निमित्तानं शालेय शिक्षण विभागानं माझे संविधान माझा अभिमान उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम 26 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी दहाला एकाचवेळी शाळा, कनिष्ठ माविद्यालयांमधून संविधानदिनानिमित्त भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले जाईल.

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. शालेयस्तरावर निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये-पोष्टर निर्मिती असे उपक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा स्वरुपात राबवायचे आहेत. त्यात विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजाचा सक्रीय सहभाग विभागाला अपेक्षित आहे. विद्यार्थी आणि पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्‍नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची व्याख्याने घ्यायची आहेत.

संविधान दिवस साजरा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तिसरी ते पाचवीच्या वर्गासाठी वक्तृत्व, रांगोळी , चित्रकला सहावी ते आठवीसाठी निबंधलेखन, वक्तृत्व, घोषवाक्ये, स्वरचित काव्यलेखन आणि पोस्टर निर्मिती स्पर्धा, तर नववी ते बारावीच्या वर्गांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व आयोजित कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे,सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने “माझे संविधान,माझा अभिमान”उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांत राबवला जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे