राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री माई यांना भारतरत्न का दिला जात नाही? शिवश्री संजय दादा सोनवणे
पाचोरा (वार्ताहार) महापुरुष सन्मान समिती पाचोरा व क्षत्रिय माळी समाज पंचमंडळ कृष्णापुरी पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांची 196 वी जयंती बुलंद, पहाडी,आक्रमक आक्रमक शैलीचे वक्ते व खान्देशची मुलुख मैदानी तोफ शिवश्री संजय दादा सोनवणे(पाटील) यांच्या व्याख्यानाने संपन्न झाली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वासुदेव माळी (माजी नगरसेवक पाचोरा) हे होते. तर कार्यक्रमांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकासाठी उपोषणाला बसणाऱ्या सुनील दादा शिंदे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), आण्णासो वासुदेव माळी (माजी नगरसेवक पाचोरा), अशोक भाऊ मोरे (माजी नगरसेवक पाचोरा), किशोर भाऊ डोंगरे (जिल्हाध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा व जिल्हा प्रचारक स.सै.दल), सामाजिक कार्यकर्ते दिपक आदिवाल (बामसेफ), तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचे काम करणारे ठेकेदार मयूर महाजन व सुनील महाजन यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विचारपीठावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक साहेबराव महाजन, क्षत्रिय माळी समाज मंडळाचे अध्यक्ष संजय शिवाजी महाले, महापुरुष सन्मान समितीचे अध्यक्ष शिवश्री सुनील पाटील सर, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते खलील दादा देशमुख, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्यउपाध्यक्ष विलास पाटील सर यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला चिंधू दादा मोकळ (माजी अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ पाचोरा), विठ्ठल महाजन सर, ए. बी.अहिरे सर, आनंद भाऊ नवगिरे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष जिभाऊ शिंदे,पाचोरा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक तथा क्षत्रिय ग्रुपचे डी.एन पाटील, मुकेश तुपे, अनिल मराठे आर. आर.सोनवणे सर, मराठा सेवा संघाचे राजू दादा पाटील, के. एस.महाजन सर, गोरख महाजन, नाना महाजन, शरद गीते सर, आनंद बागुल, पत्रकार प्रविण ब्राम्हणे, सामाजिक कार्यकर्ते जय वाघ, संतोष कदम, आकाश नन्नवरे, उमेश निकम, ऍड. अमोल म्हस्के, अजय शिरसाट व इतर असंख्य मान्यवर व श्रोता वर्ग उपस्थित होते. प्रसंगी पुस्तकांचा स्टॉल किसन सूर्यवंशी यांनी लावला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते संजय दादा सोनवणे पाटील यांनी अतिशय आक्रमक शैलीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त शाळाच सुरू केल्या नाहीत,तर शिक्षणाच्या कार्याबरोबरच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केली,रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व जगातील पहिली शिवजयंती 1869 मध्ये पुण्यात साजरी केली, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, गुलामगिरी,शेतकऱ्याचा आसूड,तृतीय रत्न यासारखी पुस्तके लिहून जनतेचे मस्तक सशक्त करण्याचे व जागृत करण्याचे काम केले. तसेच सावित्रीबाईंना देखील शिक्षित करून मुलींची शाळा चालवण्यात सहभागी करून घेतले,महात्मा फुलेंना जेव्हा त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मानभाई शेख यांनी घरात आसरा देऊन सहकार्य केल्याचा उल्लेख देखील केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच मोहम्मद पैगंबर चा पोवाडा लिहून तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास करून संत तुकाराम महाराज – छत्रपती शिवाजी महाराज – राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा एकच असल्याचे प्रतिपादन केले.तरी सुध्दा या फुले दापत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही? अशी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा परिवर्तन ग्रुप चे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वच मान्यवरांचे मनःपूर्वक धन्यवाद.



