पालखेड पाटबंधारे विभागाच्या आडमुठे धोरणामुळेच मनमाड शहरावर पाणीटंचाईची संकट!
नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) सध्या आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून बहुतेक ठिकाणी पाणीटंचाई वाढू लागली असून नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराची दारुमदार असलेल्या पालखेड पाटबंधारे विभागाच्या आडमुठे धोरणामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मनमाड शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली असून पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोवर्धने यांनी आवर्तनाद्वारे पाणी देण्यास स्पष्ट नकार दिल्याने मनमाड शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट आ वासून उभे आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यांनी दुसऱ्यांदा पत्र दिलेले असून सध्या सुरू असलेल्या आवर्तन यातूनच पाणी देण्याची मागणी केली आहे. मनमाड शहराच्या पाचवीला पुजलेला मनमाड शहराचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला असून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदळी धरणाला नैसर्गिक स्रोत नसल्याने पालखेड येथील धरणात मनमाड शहरासाठी पाणीपुरवठा आरक्षित असतो. यातूनच आवर्तनद्वारे ते पाणी पाटोदा येथील साठवणूक तलावात घेतले जाते.
यानंतर ते मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात घेऊन फिटर करून शहरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. मात्र केवळ चालू बिल ठकलेले असताना ते बिल आधी भरा तरच तुम्हाला पाणी देऊ अशी फार मोठी भूमिका पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोवर्धने यांनी घेतली असून त्यांच्या या भूमिकेमुळे दीड लाख लोकांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
नांदगाव तालुक्यातील नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांनी पाटबंधारे विभागाला फोनद्वारे आणि लेखी पत्रद्वारे विनंती केली असून आता पुन्हा एकदा दुसऱ्या पत्राद्वारे विनंती केली. मात्र कार्यकारी अभियंता यांनी पाणी देण्यास स्पष्ट भाषेत नकार दिल्याने व धरणात पाणी नसल्याने शहराला पुन्हा एकदा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या धरणातून येवला व इतर गावांना आवडताना द्वारे पाणी दिले जात आहे. मात्र मनमाड शहराला पाणी देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने भविष्यात पुन्हा एकदा संकट मनमाड शहरातील नागरिकांसमोर आ वासून उभे राहणार आहे. याकडे राजकीय नेत्यांनी राजकारण वगळता लक्ष घालावे व मनमाड शहराला त्वरित आवर्तन द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनमाड शहरातील सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
सध्या फक्त चालू बिल बाकी आहे. हे पालखेड पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिलेले आहे. यासाठी दोन वेळेस पत्रिका वर देखील केला आहे. पाटबंधारे विभागाने जनभावना लक्षात घेऊन सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावू नये. सध्या ज्या वर्धन सुरू आहे त्यातून आम्हाला पाणी देण्यात यावे. जेणेकरून आम्ही मनमाड शहराला वेळेत पाणीपुरवठा करू शकतो.
-डॉ सचिन कुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड.


