न्यायडोंगरी रेल्वे स्थानक दरम्यान काशी एक्सप्रेस मध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म…
नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) मुंबई येथून अलाहाबादला जाणाऱ्या काशी एक्सप्रेस मधून प्रवासास निघालेल्या एका गरोदर महिलेला प्रवासाच्या दरम्यान प्रसूती कला येऊ लागल्याने न्यायडोंगरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे गाडीतच त्या महिलेची प्रसूती झाली सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
नीलम आणि मनोज गौतम हे दाम्पत्य काशी एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या आरक्षित डब्यातून मणिपूर येथे गावी जाण्यासाठी निघाले होते. नांदगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि न्यायडोंगरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान यावेळी रेल्वे डब्यामध्ये असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवत सदर महिलेला धीर देत नैसर्गिक प्रसूती होण्याची वाट पाहू लागल्या. सदर महिलेला असह्य वेदना होत असल्याने याबाबत तिकीट तपासणीसाला याबाबत माहिती देण्यात आली. त्याने पुढील स्टेशनला महिलेच्याबाबत कळवून अंबूलस तत्पर ठेवण्यास सांगितले. मात्र न्यायडोंगरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे गाडीतच महिलेची प्रसूती झाली. त्या महिलेने मुलीला जन्म दिला. आई आणि मुलगी दोघेही सुखरूप असल्याने रेल्वे गाडीमध्ये असलेल्या सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला. चाळीसगाव रेल्वे स्थानक प्रमुखांनी तात्काळ महिला व तिचे नवजात बालक तपासण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवली होती.


