कुसुंबा येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र परदेशी यांना वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार..
राज्यातील कृषि उद्योजक, शेतकरी व कृषी संशोधकांचा स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान
झूम मराठी वेब मीडिया
कुसुंबा (प्रतिनिधी) कृषि दिन व संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील हॉटेल पंचवड प्राइड येथे कृषि मंथन २०२२ व स्व. वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील तरुण शेतकरी महेंद्र परदेशी यांना वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

“कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतामालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु विक्री व्यवस्थामध्ये शेतकरी लक्ष देत नाही व त्याचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालचे प्रतवारी, मूल्यवर्धन करून विक्री व्यवस्थावर भर द्यावा, शेती हाच सर्वोतपरि पर्याय भविष्यात ठरणार आहे.” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केले तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने युवा वर्गाने देखील शेतीमध्ये येण्याचे गरज आहे. तसेच विषमुक्त शेतमाल निमिती काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. सूर्या गुंजाळ यांनी केले. निमित्त होते अॅग्रोकेअर कृषीमंच नाशिक आयोजित कृषी उद्योगमंथन २०२२ उद्योजगतानिर्मिती कार्यशाळा मध्ये ते बोलत होते.
दिनांक १ जुलै २०२२ रोजी कृषि दिन व संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील हॉटेल पंचवड प्राइड येथे कृषि मंथन २०२२ व स्व. वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. शेतकरी व तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी नाशिक मध्ये एक नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी सेवा केंद्र मधील व्यवसाय संधी या विषयावर संस्थेचे अध्यक्ष भूषण निकम व गेन्स ग्रुपचे अध्यक्ष सत्यवान काशीद पाटील, महेश सावरीकर, विवेक तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.


यामध्ये यशस्वी शेतकरी, कृषी विस्तारक व संशोधक तसेच कृषी उद्योजकांसाठी स्व. वसतंराव नाईक स्मृतिदिन म्हणजेच कृषिदिन व अॅग्रोकेअर कृषीमंच संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिन निमित्ताने महाराष्ट्रातील ४० मान्यवरांना स्व. वसतंराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता प्रभू, माजी कृषि आयुक्त डॉ. पांडुरंग वाठारकर, प्रकल्प संचालक आत्माचे श्री. राजेंद्र निकम, गेन्स अॅकडमी चे चेअरमन श्री. सत्यवान काशीद पाटील, अॅग्रोकेअर कृषीमंच संस्थेचे अध्यक्ष श्री. भुषण निकम, रोहिणी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी, कृषी उद्योजक महाराष्ट्रातून उपस्थित होते.
यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षण व संगोपनसाठी रु. २२५०००/- धनादेश वितरित करण्यात आला तसेच काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कृषीभूषण कंपनीचे मोरिंगा उत्पादन अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भूषण निकम यांनी कृषिभूषण अंतर्गत कामाची माहिती याठिकाणी दिली तसेच नवीन कृषि उद्योजक निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
कृषी प्रेरणा पुरस्कार २०२२ चे सन्मानार्थी पुढीलप्रमाणे-
सविता बेद्रे, हिंगोली, अन्नपूर्णा वनरसे, सुचिता सिनगारे, संगीता सुरासे (जालना) तुळशीराम जाधव येवला, चंदूलाल राऊत भंडारा, सिद्धार्थ केदारे चांदवड, मधुकरराव घुगे परभणी, बळवंत पउळ नांदेड, मुरलीधर गुंजाळ पुणे, रावसाहेब ढगे जालना, अमोल पाटील जळगाव, बाजीराव डावरे नाशिक, दुल्लभ जाधव धुळे, अभिजीत बागूल नाशिक, रामेश्वर माळी अकोला, सतिष कानवडे अहमदनगर, राजाराम येवले सोलापूर, हेतल शिंगाडा नाशिक, स्वानंद घाटुळे सोलापूर, शाहूराव आवचर बीड, रोशन पवार सोलापूर, गणेश काळे अकोला, अश्विनी जोशी पुणे, मुकुंद ढवळे जालना, योगिनी गागरे राहुरी, विजय शेडगे राहुरी, बजरंग आयरे दापोली, आदिनाथ ताकटे राहुरी, सुयोग खोसे अहमदनगर, तुषार सूर्यवंशी जळगाव, संजय राऊत सोलापूर, मयूर नवले ठाणे, निशांत देशमुख पुणे, सुष्माताई पाटील जळगाव, डॉ. पांडुरंग वाठारकर पुणे, शिवरज मेतकर अमरावती, खांदेश महिला शेतकरी उत्पादक कं धुळे, महेंद्र परदेशी धुळे, सचिन शेलार सातारा, नवनीत पाटील जळगाव.




